राज्यात शिक्षण मंडळ अध्यक्षांची माहिती कोकणचा सर्वाधिक, तर औरंगाबाद विभागात सर्वात कमी निकाल ✌
Covid-19 विषाणूच्या संसर्गामुळे लेखी परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन पद्धतीच्या आधारे जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दहावी प्रमाणेच जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात एकूण निकाल ९९.६३ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९९.८१ टक्के निकाल लागला तर औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी ९९.३४ टक्के निकाल लागला. विद्यार्थ्यांनीचा निकाल ९९.७३ टक्के तर विद्यार्थ्यांचा निकाल ९९.५४ टक्के आहे. गतवर्षीपेक्षा यंदाचा निकाल ८.९७ टक्क्यांनी जास्त आहे.शाखानिहाय निकाल वाणिज्य शाखेचा ९९.९१ टक्के निकाल लागला आहे. राज्यातील ४६ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. तर १२ विद्यार्थ्यांना ३५ गुण मिळाले आहेत.
