अभिनेता घनश्याम नायक यांचे निधन
मुंबई: तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेत नट्टू काका ही भूमिका बजावत घराघरात पोहोचलेले अभिनेता घनश्याम नायक प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
ते 77 वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. निर्माते असित कुमार मोदी यांनी ॐ शान्ति असे टि्वट करत नट्टू काका यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून घनश्याम नायक यांची कर्करोगाशी झुंज सुरू होते. अखेर रविवारी यांची प्राणज्योती मालवली.घनश्याम त्यांच्यावर काही महिन्यापूर्वी एक शस्त्रक्रिया झाली होती.
गेल्या 50 हून अधिक वर्षापासून घनश्याम नायक प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. त्यांना खरी ओळख आणि प्रसिद्ध तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून झाली. या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. नट्टू काका या पात्राला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. नट्टू काका हे या मालिकेत सुरुवातीपासून जोडलेले होते. त्यांची एक विनोदी शैली, त्यांचे संवाद प्रेक्षकांना आवडायचे.
घनश्याम नायक यांनी जवळपास 350 हुन अधिक टीव्ही मालिकेमध्ये काम केले आहे इतकच नव्हे तर अनेक बॉलिवूड चित्रपटातही ते झळकले होते. सलमान खानच्या हम दिल दे चुके सनम, तेरे नाम, यासारख्या सुपरहिट चित्रपटातंही काम केले आहे.