अफगाणिस्तान मध्ये अराजक पळापळ
तालिबानने काबुल जिंकल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानात अराजक मांडले आहे हजारो नागरिकांनी जिवाच्या आकांताने काबुल विमानतळावर धाव घेतली आहे. लोक एखाद्या बस सारखे मिळालेल्या विमानाने देश सोडताहेत. या प्रयत्नात ३ जीवांचा उडत्या विमानातून दुर्देवी मृत्यू झाला. काबुल विमानतळ प्रवासी विमानांसाठी बंद करण्यात आले आहे. हे विमान लवकरच भारतीयांना घेऊन इराण मार्गे मायदेशी परत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, जर्मनी आधी अनेक देश आपल्या नागरिकांना अफगाण बाहेर काढण्यात प्रयत्नशील आहे