ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालाची स्वाक्षरी
मुंबई: ओबीसी क्षेत्रातील सुधारित अध्यादेशांवर राज्य भगत सिंगल कोश्यारी यांनी स्वाक्षरी दिली आहे.
ओबीसी आरक्षान्त अध्यादेशावर राज्यपालाची स्वाक्षरी
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागू शकतो.
ओबीसी च्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला होता.
राज्यपालाच्या मंजुरीसाठी तो पाठविण्यात आला होता मात्र काही सूचनांसह राज्यपालांनी तो फेरविचारार्थ सरकारकडे परत पाठवला होता.
आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानााओबीसी अध्यादेश कसा ॽ असा प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. राज्यपालांनी अध्यादेश परत पाठवल्यानंतर यात आवश्यक ते बदल करून राज्य सरकारने तो पुन्हा राज्यपालांकडे पाठविला.
त्यावर आता राज्यपालांनी स्वाक्षरी केली.
राज्यपालांनी आता अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याने त्यांचे कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्याला कायमस्वरूपी करण्यासाठी विधानमंडळात त्याबाबतचे विधेयक मंजूर करावे लागेल.
आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांनी देखील या प्रकारचा अध्यादेश काढला होता.
त्याच धर्तीवर राज्य सरकारने हा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या अध्यादेशाची ओबीसीच्या जागा काही कमी कमी होतील.