बारावीच्या निकालाद्वारे होणार पदवी प्रवेश प्रक्रिया
इयत्ता बारावीच्या निकाला च्या आधारेच बी.ए, बी. कॉम आणि बी. एस्सी या पारंपारिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल. या प्रवेशासाठी कुठलीही साईटी परीक्षा घेतली जाणार नाही, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि.४) पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.
