मराठा आरक्षणासाठी
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोढंरे, विकास पासलकर, रघुनाथ चित्रे, बाळासाहेब अमराळे, सचिन आडेकर आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणाची राज्यस्तरीय निर्णय बैठक सोमवारी पुण्यात पार पाडली. या बैठकीला राज्यातील २२५ तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगडे मराठा क्रांती मोर्चा व राज्यातून आलेल्या समन्वयकांनी आपली भूमिका विशद केली. यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाला आपण सामाजिक मागास असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे, तोपर्यंत आरक्षण मिळू शकणार नाही.
आत्तापर्यंत 6 कमिशन आले आहेत. या कमिशनमध्ये कायामत मराठा समाजाला वंचित ठेवण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराजांचा मी वंशज असल्याने आता १२ बुलतेदांरामधील अनेक जणांनी मला भेटून आमच्या आरक्षणाचे आता काही खरे नाही, ही बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी धाडसाने भूमिका मांडत आहे. त्यात माझे राजकीय नुकसान होत आहे मात्र मी कुठेही तडजोड करणार नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आत्तापर्यंत २२ मागण्यांवर चर्चा झाली आहे. लोकांना फसविणे आमच्या रक्तात नाही. आतापर्यंत सर्व विषयावर चर्चा झाली आहे आंदोलने झाली आहेत. या सर्वांतून आता मार्ग निघत नाही, म्हणून मी लवकरच आजात मैदानावर लाक्षणिक उपोषण करणार आहे नाशिक आणि कोल्हापूर आला मूक आंदोलन झाले आहे. आता नांदेडला आंदोलन घेतले जाणार आहे