शेअर बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांचे 2.57 लाख कोटी बुडाले
नवी दिल्ली. जागतिक बाजारपेठे
त मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने बुधवारी सेन्सेक्स 555 अंकांनी घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 2 लाख 57 हजार 785.17 कोटींचे भांडवल बुडाले आहे. सेन्सेक्स घसरून 59 हजार 189.73 अंकावर आला. या व्यतिरिक्त कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे महागाई वाढण्याची अपेक्षा आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 176 30 अंकांनी खाली 17,646 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेच्या शेअर सर्वाधिक 3.38 टक्क्यांनी घसरला
टाटा स्टील, बजाज ऑटो, सन फार्मा एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टायटन यांची घसरण झाली. दुसरीकडे एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि बजाज फायनान्स 1.24 टक्क्यापर्यंत वाढले.
एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख एस. हरिहरन म्हणाले की. जागतिक घडामोडींमुळे बाजारावर परिणाम होत आहे. ऊर्जेच्या किमती वाढत आहेत मागणी विशेष नाही. त्यात जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. बीएसई मिडकप आणि स्मॉलकॅप 1.22 टक्क्यांपर्यंत घसरले अशाप्रकारे शेअर मार्केट खाली पडले