दिल्लीत मुख्यमंत्री:आज माझी आणि भावाच्या चर्चांना तूर्त पूर्णविराम
काही दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना आज-माजी मंत्री आणि भावी सहकारी असा उल्लेख केला होता.
त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले भविष्यात शिवसेना भाजप एकत्र येणार का, असे तर्क-वितर्क लढवले गेले.
या पार्श्वभूमीवर रविवारी उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्ली दोरा केला. या दौऱ्यात ते वैयक्तिक ते भेट घेतली, विशेष भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांची अनैपचारिक चर्चा होईल, असे तर्क लावले जात होते. मात्र ठाकरे यांनी असेल न करता औपचारिक बैठक झाल्यानंतर ते थेट मुंबईला परतले.
नवी दिल्लीत रविवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त राज्यातील मुख्यमंत्र्याच्या बैठकीचे आयोजन केले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीत हजर होते.
यावेळी नक्षलग्रस्त भागात कराव्या लागणाऱ्या उपायोजना वर चर्चा करण्यात आली बैठकीनंतर अमित शहा यांनी उद्धव ठाकरे, नितीश कुमार आणि शिवराजसिंग चौहान यांच्यासह स्नेहभोजन घेतले.
त्यानंतर वैयक्तिक भेटीगाठी घेतली, अशी शक्यता होती मात्र तसे झाले नाही.
बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील, यासाठी माध्यमही तयारीत होते, परंतु मुख्यमंत्री थेट मुंबईला आले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात मोठी दुरावा निर्माण झाला होता.
त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे शहा यांना रविवारी प्रथमच भेटले. या बैठकीनंतर दोघांमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी १० वाजता दिल्लीत विज्ञान भवन या बैठकस्थळ पोहोचले.
दोन वाजता बैठकीनंतर ते मुंबईला येण्यासाठी विमानतळाकडे निघाले. गृहमंत्री शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री ठाकरे यांची स्वतंत्र भेट झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.