महिला ह्याच वर्षी देतील एनडीएची प्रवेश परीक्षा
केंद्राला पुढील वर्षापर्यंत मदत देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
नवी दिल्ली: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आर्थात एनडीएतील प्रवेशासाठी महिलांना पुढील वर्षापासून संधी देण्याचा केंद्रीय सरकारचा प्रस्ताव बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत, या वर्षी होणाऱ्या परीक्षेचे महिलांना बसण्याची संधी देण्याचे निर्देश दिले.
या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी एनडीएची प्रवेश परीक्षा होणार आहे.
त्यामुळे पुढील वर्षी महिलांची पहिली बॅच एनडीएतील प्रशिक्षणासाठी सज्ज होईल.
महिलांच्या एनडीए प्रवेशाच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
त्यानुसार महिलांचा एनडीएतील प्रवेश आणि प्रशिक्षणासाठीची सुनियोजित प्रक्रिया तयार करून महिलांना एनडीए प्रवेश परीक्षेची परवानगी देणारी आधिसुचना मै 2022 पर्यंत काढण्यात येईल, असे सरकारला सांगितले आहे.
मात्र बुधवारच्या सुनावाणीवेळी सुप्रीम कोर्टाने सरकारला एक वर्षाची मुदत देण्यात पष्ट नकार दिला आहे.
आम्ही महिलांच्या एनडीए प्रवेशाचा आदेश दिल्यानंतर त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.