आय आय टी मुंबईचा शुभम कुमार देशात अव्वल
नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) 2020 च्या नागरिक सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
या परीक्षेत बिहारचा रहिवासी असलेला आयआयटी मुंबई चा विद्यार्थी शुभम कुमारने सर्वाधिक गुण मिळवून देशपातळीवर तब्बल स्थान पटकावले.
तर जागृती अवस्थीने दुसरे तर अंकित जैनने तिसरा क्रमांक मिळविला.
या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातील मृणाली जोशी हिने 36 वी तर विनायक नरवडेने 37 वी रँक पटकावली.
औरंगाबादच्या सुभाष भाऊसाहेब नागरगोजे याने 453 वा क्रमांक मिळवला आहे.
प्रतिष्ठित आयआयटी मुंबईमधून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी घेणाऱ्या सुभाष कुमारने युपीएससीत मानवशास्त्र हा पर्याय विषय म्हणून निवडला होता.
कुमारने सर्वाधिक गुण मिळवत या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला. तर समाजशास्त्र हा पर्याय विषय म्हणून जागृती अवस्थीने दुसरा क्रमांक मिळवला.
आयएएस अधिकारी आणि 2015 च्या तुकड्यातील टॉपर डीना डाबी यांची बहीण रिया डाबीने 15 वी रँक मिळवली आहे. राज्यात मृणाली जोशीने सर्वाधिक गुण मिळवत देशपातळीवर 36 वी रँक पटकावली.
21 वर्षाच्या नितिषा जगतापने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाली
काल तिची दिल्लीत मुलाखत झाली आणि आज निकाल लागला.
अशाप्रकारे यूपीएससी 2021 चा निकाल लागला.