कोरोना बळी:कोरोना बळीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई
कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांस सानुग्रह मदत म्हणून 50 हजार रुपये देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे.
मात्र याची जबाबदारी राज्यावर सोपवली आहे. मदतीची ही रक्कम राज्याच्या आपत्ती मदत निधी अर्थात एसडीआरएफ मधून देण्यात येईल.
देशात कोरोनामुळे सुमारे साडेचार लाख लोक मृत्युमुखी पडले असून, महाराष्ट्रातील आकडा सर्वाधिक एक लाख 36 हजार इतका आहे
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधिकारणाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर कोरोना बळी प्रकरणी आर्थिक मदत आणि त्यासंदर्भातील प्रक्रियेबाबत माहिती दिली.
देशातील प्रत्येक कोरोना बळीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याची आमची तयारी आहे.
कोरुना विरोधी लढ्यात किंवा मदत कार्यात सहभागी झालेल्या आणि कोरोना मुळे दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना देखील ही मदत मिळणार आहे.
केंद्रने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण की बात जिल्हा प्रशासन या निधीचे वितरण करेल ही मदत मिळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचे आणि तसा मृत्यू प्रमाणपत्रावर उल्लेख असणे आवश्यक असेल.