दिल्ली देशभरात कडेकोट सुरक्षा

स्थानक आणि सीमारेषेत विविध महत्वाच्या ठिकाणी बहु आयामी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी शहरातील गस्त वाढविण्यात आली आहे. यमुना नदीपात्रात देखील दिल्ली पोलिसांकडून मोटार नौकेद्ररे लक्ष ठेवले जात आहे. संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन दहशतवादी विरोधी कारवाईची सज्जता ठेवण्यात आली आहे. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर कोणत्याही प्रकारच्या हवाई वस्तू आणि फुग्यावर बंदी घालण्यात आली आहे लाल किल्ला परिसरात प्रमुख्याने इतर सुरक्षा संस्थेसोबत मिळून कडा पहारा उभारण्यात आला आहे