आर्युवेदचार्य डॉ बालाजी तांबे यांचे निधन झाले
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी वासुदेव तांबे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ८१ वर्षाचे होते. मागील आठवडाभरापासून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले ,सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. लोणावळ्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या एमटीडीसी शेजारी डॉ. तांबे यांचे.आत्मसंतूलन व्हिलेज' नावाने आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे. मागील पाच दशकाहून अधिक काळापासून त्यांनी या ठिकाणाहून जगभरात आयुर्वेदाचा प्रसार केला होता