कोविशिल्ड कोव्हक्सीनचा मिक्स टोस अधिक प्रभाव
कोविशिल्ड व कोव्हक्सीनच्या मिक्स डोस मुळे कोरोना विरोधात अधिक प्रभावी रोगप्रतिकारक्षमता तयार होत असल्याचा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) एका संशोधनात करण्यात आला आहे गत मे-जून महिन्यात उत्तर प्रदेशातील ९८ लोकांवर हे संशोधन करण्यात आले. यातील १८ जणांनी अनपेक्षितपणे कोविशिल्डचा महिला व कोव्हक्सीनचा दुसरा डोस घेतला होता. मिक्स डोसमुळे त्यांच्यात चांगली रोगप्रतिकारक क्षमता तयार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कोविशिल्ड व कोव्हक्सीनचा मिक्स डोस सुरक्षित असून त्याचे प्रतिकूल परिणाम हे एकाच लसीच्या २ डोस सारखे आहेत; असे आयसीएमआर' ने म्हंटले आहे हे संशोधन प्री प्राप्रिटं मेडआरविक्स' वर अपलोड करून बीटा डेल्ट रूपाविरोधात अधिक चांगली रोगप्रतिकारक क्षमता तयार झाल्याचे निष्पन्न झाले या संशोधनाचा देशातील लसीकरण मोहीमेवर सकारात्मक परिणाम होण्याचा दावा संशोधकांनी केला आहे.