उच्च शिक्षण मंत्री सामंत यांची घोषणा सीईटी होणार नसल्याचे स्पष्टीकरण
दहावीच्या निकालानंतर अकरावी अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यानंतर बारावीनंतर देखील सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत सामंत म्हणाले, नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. अकरावीसाठी विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार आहे. त्यानंतर पुन्हा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी नको, असा एक मतप्रवाह होता. यासंदर्भात कुलगुरूसंमवेत आलेल्या चर्चेनंतर विज्ञान, वाणिज्य आणि कला या पारंपारिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष परीक्षेसाठी सीईटी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही.