आता प्रत्येकाला मिळणार डिजिटल हेल्थ कार्ड
मोदीच्या हस्ते आयुष्यमान डिजिटल मिशनची सुरुवात
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत-डिजिटल मिशन' ची योजनेतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या आरोग्याची इत्यंभूत माहिती असणारे एक डिजिटल हेल्थ कार्ड मिळेल.
यामुळे भविष्यात रुग्णालयात उपचारासाठी जाताना आरोग्याची ताडजूड फाईल सोबत नेण्याची गरज उरणार नाही. मोदी या योजनेमध्ये आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणा होणार असल्याचा दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेच्या पायलट योजनेची घोषणा केली होती.
संघाची स्थिती हे योजना देशातील सहा केंद्रशासित प्रदेशात राबवण्यात येत आहे.
आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजने मुळे गरिबांच्या जीवनातील सर्वात मोठी चिंता दूर केली आहे.
आत्तापर्यंत २ कोटीहून अधिक नागरिकांनी या योजनेंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे.
यातील निम्मे लाभार्थी आमच्या माता भगिनी आहेत; असे मोदी या योजनेची सुरुवात करताना म्हणाले.
