आज गणेश चतुर्थी
अवघ्या जगाचे लाडके दैवत म्हणून ओळखले जाणाऱ्या गणरायाचे आगमन यंदाही कोरोनाच्या सावटाखाली होत आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने भेदरलेल्या लोकांना आशेचा किरण दाखवत विघ्नहर्ता येणार असल्यामुळे सारे भक्तगण आनंदामध्ये आहेत
तरी सरकाराच्या नियम आणि अटी मध्ये सार्वजनिक मंडळाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.
तर दुसरीकडे यंदाच्या वर्षात देखील वादळ अतिवृष्टी मुळे बळीराजा दुखावला आहे
कोकणाला वादळाने तडाखा दिला तर विदर्भ मराठवाड्यात अध्यापिक पावसाचा हाहाकार सुरू आहे
नैसर्गिक आपत्ती आणि महामारी च्या कचाट्यात सापडलेल्या जनतेला या अतिवृष्टी तून मुक्ती दे
हीच हाक अवघे भक्तजन घालत आहेत.