पंजाबला प्रथमच मिळणार दलित चेहरा
मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी उपमुख्य मंत्रीपदी रंधावा व ओम प्रकाश सोनी
चंदिगड: काँग्रेस नेते चरणजित सिंग चन्नी यांनी सोमवारी पंजाबचे 16 मुख्यमंत्री म्हणून पद गोपनियतीची शपथ घेतली. त्यांच्या स्वरूपाने प्रथमच पंजाबची सुत्रे एका दलित व्यक्ती कडे आली आहेत. चन्नी यांच्यासह सुखजिंदरसिंग रंधावा व ओमप्रकाश सोनी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या दोघांची राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. रंधावा जाट शीख तर सोनी हिंदू समुदायाचे आहेत.
या तिघांच्या निवडणुकीद्वारे काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेस त्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी चरणजितसिंग चन्नी यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार चन्नी यांनी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली
त्यानंतर राहुल यांनी चन्नी, रंधावा व सोनी यांना तिघांनाही भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.