राज्यपाल मुख्यमंत्री मध्ये लेटर युद्ध
महिला अत्याचार प्रकरणावरून राज्यपालाच्या पत्राला पत्राने चोख प्रत्युत्तर.
मुंबई. राज्यातील महिला असुरक्षित आहेत. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना असल्याने याबाबत विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून चर्चा करावी, अशा आशयाचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील पत्राद्वारेच राज्यपालांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मी आपल्या भावना समजू शकतो आपण आज महाराष्ट्र राज्याच्या घटनात्मक प्रमुख पदावर आहात.
आपला पिंड राजकीय कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे आता विधीमंडळाचे खास अधिवेशन बोलावून चर्चा घडवण्याची आपली सूचना नवा वाद निर्माण करू शकते.
सरकारविरुद्ध लोकांची विशेष अधिवेशनाची मागणी सुरु असताना राज्यपालांनी त्याचीच सुरांत सूर मिसळून तीच मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे.
राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली.
