प्रियंका 17 दिवसांत दुसऱ्यांदा पोलिसांच्या ताब्यात
लखनौ: उत्तर प्रदेश पोलिसांनी बुधवारी आग्र्यातील एका मृत स्वच्छता कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांना ताब्यात घेतले. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशाचे राजकारण चांगले तापले आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्याच्या मंगळवारी पोलिस कोठडीत मृत्यू झाला. प्रियंका गांधी बुधवारी या कर्मचाऱ्याच्या शोकसंतप्त कुटुंबीयांना भेटण्यासाठी सात होत्या. पण उत्तर प्रदेश पोलिसांनी रस्त्यातच त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीसांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लु यांच्याशी धक्काबुक्कीही झाली.
यूपी पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मृदावरून प्रियंकाना ताब्यात घेतले चा दावा केला आहे. त्यावर प्रियंकानी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यामुळे कायदा-सूव्यवस्थेच्या कशी बिघडू शकते असा उलट सवाल केला आहे.
एखाद्या पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केल्यामुळे कायदा-सुव्यवस्था कशी काय बघू शकते मी सरकाराला खुश करण्यासाठी लखनौच्या गेस्ट हाऊस मध्ये विश्रांती करून काय एखाद्याला पोलीस कोठडीत ठार मारणे कुठला न्याय आहे. जिथे जाईल तिथे माझा मार्ग रोखला जात आहे. असे त्या राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या.
या कारवाईनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठीक ठिकाणी निदर्शने केल्यामुळे पोलिसांनी काही वेळेतच प्रियंकांची सुटका केली. त्यानंतर या पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आग्र्याकडे रवाना झाल्या. दरम्यान प्रियंकां ना गत 3 तारखेलाच लखीमपुर खिरी हिंसाचारातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्या बदली त्या 30 तीस तासापर्यंत पोलिसाच्या ताब्यात होत्या