पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका सुरूच
नवी दिल्ली: देशात वाहन इंधनाचे दर कमी होण्याऐवजी दिवसेदिवस वाढतच आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत शनिवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
पेट्रोलियम कंपनीने मूल्य अधिसूचनांनुसार शनिवारी पेट्रोलच्या दरात 25 पैशांनी, तर डिझेलच्या 30 पैशांनी वाढ केली आहे.
त्यानुसार आठवड्याभरात पेट्रोलच्या दरात चौथ्यांदा तर गेल्या 9 दिवसात डिझेलच्या दरात सातव्यांदा वाढ झाली आहे.
त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका सुरूच आहे.
या दरवाढीला नुसार मुंबई पेट्रोलचा दर 108.19 रुपये, तर डिझेलचा दर 98.16 रुपये प्रति लिटर आहे, तर दिल्लीत पेट्रोल 102.14 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
स्थानिक कर आणि वाहतुकीवर अवलंबून विविध राज्यात वाहन इंधनाच्या किमती वेगवेगळ्या असतात. आंतरराष्ट्रीय रस्त्यावर कच्च्या तेलाचे दर वाढल्याने ही तर वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेलाचा सरासरी दर 78 डॉलर प्रति बॅलरवर पोहोचला आहे. दरम्यान देशाच्या प्रमुख शहरात पेट्रोलने प्रतिलिटर साठी. शंभरीचा हा कडा पार केला आहे तर गेल्या 9 दिवसात डिझेलच्या दरात सातव्यांदा वाढ करण्यात आली आहे.