दहावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या
दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याने फाशी घेऊन जीवन संपविल्याची दुदैवी पटना उत्तर प्रदेशाच्या बलिया जिल्ह्यात पडली. रेवती वस्तीमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय अंशने मंगळवारी रात्री घरातील पंख्याला ओढणी बांधून फाशी घेतली कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती न देताच रात्रीतून अंत्यसंस्कार करून टाकले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेल्या दहावीच्या निकालात कमी गुण पडल्याने निराश झालेल्या अंशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांना सांगितले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या इतर विद्यार्थ्यांनी बुधवारी जवळपास दोन तास मुख्य महामार्गावर रस्ता रोको केला होता.